Posts

children's stories

स्टोन पेपड सिजड....आणि छातीत धस्स!!! एक वर्षभारापुर्वीची गोष्ट. निरूचा वाढदिवस मल्हारच्या वाढदिवसानंतर तीन महिन्यांनी असतो. मल्हारचा चौथा वाढदिवस झाला होता. निरूचा वाढदिवस म्हणून तिला ‘ट्रेंड्स’ (कपड्यचा मॉल) मधे कपडे आणायला गेलो होतो. निरु,   रेखा, युवराज, मल्ह्रार आणि मी. मॉल मधे घुसल्याबरोबर पोरं धावत धावत पहिल्या मजल्यावर थेट ड्रेसिंग रुमच्या दिशेने अन त्यांच्यामागे मी. समोरून एक सडपातळ college girl तिच्या मैत्रिणीकडून   ओपिनियन घेत   होती. ही पोरं त्या पोरीला वळसा घालून माघ वळली. मॉलमधे  शिरल्यापासून पोरांनी नुस्ता धिंगाणा करायला सुरुवात केली होती. त्या पोरींनी आकर्षक fancy कपडे, हाय हीलचे सॅंडल्स घातली होती. टक टक आवाज करत तिथल्या तिथं कॅटवॉक करत होत्या. हातात मोबाईल. त्यातील एक सेल्फी स्पेशालीस्ट होती अन pout स्पेशालीस्टसुद्धा. मी तिच्याकडे पाहत होतो. रेखा हळूच, “अहो.....” माझं रेखाकडे   लक्ष गेले नाही. थोडासा आवाज चढवून पण दबक्या आवाजात, “अहो...कपडे बघा निरुसाठी.” मी ‘हो’ म्हणालो आणि त्या दोघी त्यांच्या स्वर्गात गेल्या   आणि मी माझ्...